Mumbai Diwali Market: मुंबईत दिवाळी खरेदीची धूम; दादर, काळबादेवीसह उपनगरांतील बाजारपेठा गर्दीने फुलल्या

पणत्या ६० रुपयाला चार नग, तर ९० रुपयांना ६ नग
Mumbai Diwali Market
Mumbai Diwali MarketPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: आनंदाचा व उत्साह असलेला सण म्हणजे दिवाळी सण. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली आहे. रविवारची सुट्टी साधत मुंबईकरांनी मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे धाव घेतली.

आकाश कंदील (दिवे),पणत्या आणि घराच्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दी पाहायला मिळाली. महागाईचे सावट असतानाही सणाचा उत्साह कायम असल्याचे चित्र मुंबई बाजारपेठेत दिसून आले.

Mumbai Diwali Market
Eknath Shinde: ‘लोकशाही बचाव’चा ढोंगी नॅरेटिव्ह उघडा पाडा; राहुल गांधी आणि काँग्रेसवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

दिवाळी हा सण ६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. येत्या रविवारी म्हणजेच ८ नोव्हेंबरला एकाच दिवशी दिवाळी व लक्ष्मीपूजन आहे. साहित्य खरेदीसाठी दादर, भुलेश्वर मार्केट, काळबादेवी या घाऊक बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. काल शनिवार व रविवार सुट्टी दिवशी बाजारपेठेत मोठी गर्दी होती.

रंगीबेरंगी आकाश दिवे, एलईडी विद्युत माळा, लटकन आणि दर्शनीदारावरील आकर्षक तोरण यांसारखे सजावट साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काळबादेवी परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये एलईडी विद्युत व देशी विद्युत माळा होत्या. शंभर बल्ब चायनीज विद्युत माळा हे साधारणतः तीनशे रुपयांपासून ते आठशे रुपये आणि अकराशे रुपयांपर्यंत होते.

Mumbai Diwali Market
Navi Mumbai Water Cut: पाण्याचा गैरवापर थांबविला तर कपातीची वेळ येणार नाही; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे गणेश नाईक यांचे आवाहन

दुसरे म्हणजे; आकाशकंदील. दादर रेल्वे स्थानकाजवळ आणि माहीमच्या कंदील गल्लीत पैठणी, जूट, कागदी पेपर अशा विविध प्रकारचे आकाश कंदील होते.सर्वसामान्यांना परवडेल आकाश कंदील दोनशे रुपयांपासून सुरू होते. २५० रुपये ,साडेतीनशे रुपये ,५०० रुपये ते १ हजार रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत होते.

तसेच रांगोळीमध्ये पिवळा,लाल, नारंगी,भगवा, हिरवा असे विविध रंगी प्रकार होते. पांढऱ्या रांगोळीला सर्वाधिक मागणी होती.याचबरोबर श्रीलक्ष्मी पावले, कमळ, ओम,शुभ-लाभ असे प्रकाराचे विविध प्रकारचे रांगोळीचे साचे आहेत.एक नग ३० रुपयांना इतका होता.

दरम्यान,ऑनलाइन खरेदीपेक्षा प्रत्यक्ष बाजारपेठेत खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.याबाबत दादर येथील रांगोळी विक्रेते संतोष केवट म्हणाले, रांगोळीची विक्री २८ वर्षांपासून करीत आहे.

गतवर्षीएवढेच रांगोळीचे दर आहेत. यावर्षी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबई,नाशिक,पुणे,भिवंडी (जि.ठाणे) या ठिकाणी उत्पादन होते. मुंबईत मस्जिद बंदर,अंधेरी, गोरेगाव येथून रांगोळी आणली जाते.रांगोळीचा लहान ग्लास दहा रुपये, तर मोठा ग्लास २० रुपयांना होता.

दिवाळीत सजते ती विविधरंगी आकाश कंदीलने. कच्च्या मालामध्ये झालेली दरवाढ आणि मनुष्यबळाची वाढलेली दिवसाची मजुरीमुळे आकाश कंदीलामध्ये सरासरी आठ ते दहा टक्के दरवाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला ३५० ते ४०० रुपये मजुरी होती,ती आता पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत गेली आहे.याचा परिणाम आकाश दिव्याच्या किमतीवर झाला आहे .

- संतोष पाटणे, विक्रेते मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.