Dahisar Land Dispute Case: आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला दोषमुक्ती मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आरोप निश्चित होऊन खटला सुरू झाल्याने या टप्प्यावर दोषमुक्ती देता येणार नाही, न्यायालयाचे स्पष्ट मत
Bombay High Court
Bombay High Courtfile photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: दहिसर (पश्चिम) येथील एका भूखंडाच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात आरोपी मुकेश चुन्‍नीलाल भाटिया यांची फौजदारी रिव्हिजन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला दोषमुक्ती मिळणार नाही, असा निर्वाळा देत न्यायमूर्ती एम. एम. साठये यांनी हा निकाल दिला.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, १८ जुलै २०२१ रोजी पहाटे ३ वाजता फिर्यादी त्यांचे वडील, भागीदार, दोन मुले आणि वकील यांनी दहिसर येथील वादग्रस्त भूखंडावर १५ ते २० लोकांनी येऊन लावलेला बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला.

Bombay High Court
Mumbai Local: परराज्यातील प्रवाशांचे लाड, मुंबईकरांवर अन्याय!सीएसएमटी येथून रात्री ८ ते ८.४५ दरम्यान एकही फास्ट लोकल नाही

त्यावेळी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला संघटित गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाच्या इशाऱ्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात कांदिवली येथील रहिवासी असलेल्या मुकेश भाटिया याला आरोपी करण्यात आले होते.

Bombay High Court
Maharashtra Police Transfers: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, तिघांना मुदतवाढ

विशेष ‘मोका’ न्यायालयाने आरोपी भाटिया याला ‘मोका’ कायद्याच्या कलमांमधून दोषमुक्त केले होते; परंतु भारतीय दंड संहितेच्या अन्य गंभीर कलमांखालील गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला होता.

या नकाराविरोधात भाटियाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू झाला असून, दोषारोप निश्चिती झाली असल्याने, आता या टप्प्यावर त्याला दोषमुक्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि याचिका फेटाळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.