Mumbai Cyber Fraud: 'गॅस सेवा बंद होईल' म्हणत पाठवली APK लिंक; वृद्धाची 15 रुपये भरण्याच्या बहाण्याने 10.35 लाखांचा फसवणूक

या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई: गॅस सेवा बंद होऊ नये म्हणून तातडीने पंधरा रुपये भरण्यास सांगून बोगस एपीके लिंक पाठवून वृद्धाची सायबर ठगांनी १० लाख ३५ हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

६२ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी व मुलासोबत परळ येथे राहतात. ३० जूनला त्यांना एका अज्ञाताने कॉल करून तो महानगर गॅस लि. कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून गॅस सेवा बंद होऊ नये म्हणून तातडीने पंधरा रुपये बिल पेमेंट करावे लागेल, असे सांगितले.

Cyber Fraud
Property Ownership: मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णयाचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्यांना व्हॉटअपवर एक लिंक पाठवून पंधरा रुपये भरण्याचा सल्ला दिला. त्यांनी ती लिंक ओपन करून बँकेची माहिती भरल्यानंतर काही वेळात त्यांच्या खात्यातून १० लाख ३५,८१७ रुपये डेबीट झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news