Mumbai Corporator Disqualification: आज दोन नगरसेवक पद गमावणार; शिवसेना ठाकरे गट व एमआयएम नगरसेवकांचा समावेश

पालिका सभागृहाची तातडीची बैठक
BMC
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक लढवताना जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवून शिवसेना ठाकरे गट व एमआयएमच्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्दबातल केले आहे. यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी गुरुवारी पालिका सभागृहाची तातडीची बैठक ठेवण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या गोवंडी एम-पूर्व विभागातील १३७ प्रभागातून निवडून आलेल्या एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे जात प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाले आहे. त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांचेही जात प्रमाणपत्र रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

BMC
High Court Judgment: पती जिवंत असेपर्यंत घटस्फोटित पत्नीला वाढीव पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

सावंत यांनी नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भांडुप एस विभाग प्रभाग क्रमांक १११ मधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र निवडणूक विभागाकडून गुरुवारी सकाळपर्यंत मुंबई महानगरपालिकेला प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहाची सोमवार२२ जूनला होणारी बैठक गुरुवार १८ जूनला ठेवण्यात आली. दोन्ही नगरसेवक विरोधी पक्षातील असल्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेने तातडीने बैठक ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या नगरसेवकांना जात पडताळणी समितीसह कोर्टात दाद मागण्याचा पर्याय उरणार नाही.

BMC
EV Charging Stations: ईव्ही चार्जिंग स्टेशन ही भविष्यात सोन्याची खाण ठरतील असे या तरुण उद्योजकाला का वाटते?

दोन्ही प्रभागांत पुन्हा निवडणूक !

जात पडताळणी समितीने जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. परंतु निवडणूक लढवताना दोन्ही नगरसेवकांनी फसवणूक केल्यासंदर्भात याचिका दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवाराने केल्यास कोर्ट दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्याला नगरसेवक म्हणून घोषित करू शकते. परंतु हे सर्वस्वी कोर्टावर अवलंबून आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news