Mumbai Coastal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगदा बनला ‘रेस ट्रॅक’; आलिशान गाड्यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल

१६ पैंकी ११ वाहने ताब्यात, पाचचा शोध सुरु
Mumbai Coastal Road
रेसमुळे बोगद्यात वेगाचा थरार पहावयास मिळतो.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगदा आलिशान गाड्यांसाठी ‘रेस ट्रॅक’ बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगाने एकापाठोपाठ धावणाऱ्या आलिशान गाड्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्बल १६ वाहनांची ओळख पटवण्यात आली असून, त्यापैकी ११ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. उर्वरित पाच वाहनांचा शोध सुरू आहे.

३ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ११.१५ वाजता मरीन ड्राइव्हजवळील कोस्टल रोडच्या दक्षिणमुखी बोगद्यात आलिशान वाहने सुसाट वेगाने धावत असल्याचा व्हिडीओ समोर आला. लॅम्बॉर्गिनी, बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या कारसह अनेक वाहने या ‘रेस’मध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला.

Mumbai Coastal Road
Mumbai municipal hospital : राजावाडीतील ऑपरेशन थिएटरमध्ये घामाच्या धारा !

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ११ वाहनांमध्ये आलिशान कारसोबत टोयोटा फॉर्च्युनर, एमजी हेक्टर, ह्युंदाई अल्काझार, होंडा सिटी व महिंद्रा एक्सयूव्ही या वाहनांचाही समावेश आहे. ही वाहने विधान भवन परिसरातील पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. एक गुन्हा ताब्यात घेतलेल्या ११ वाहनांशी संबंधित आहे, तर दुसरा ३ सप्टेंबरच्या रात्री बोगद्यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Coastal Road
MBBS fee hike : वैद्यकीय अभ्यासक्रमात ५६ टक्के शुल्कवाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news