

Amol Mitkari Post Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनावर आज (दि. २) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदास एक्स पोस्ट करत महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “माझा विश्वास आहे आणि माझ मन सांगतय दादा असे जाऊच शकत नाहीत.ज्यांनी कुणी हा देवमाणुस हिरावून नेण्याच पाप केल असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल."
अमोल मिटकरी यांनी सुरूवातीला सहा लोकांचा मृत्यू असं दाखवलं. मात्र नंतर फक्त ५ डेड बॉडी कशा काय मिळाल्या. सहावा व्यक्ती कुठं आहे. टेक ऑफच्या डिजीटल नोंदणीवेळेच्या माहितीत विसंगती कशी आहे अशी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी याबाबत आपण दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे देखील सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचेही स्पष्ट केले होते.