Mumbai News: मुंबईत धक्कादायक घटना! १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून ढकलले; CCTV व्हिडिओ समोर

Mumbai Goregaon Toddler Death: सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेजारी राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुरडीला ढकलल्याचे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Mumbai Goregaon Toddler Death
Mumbai Goregaon Toddler DeathPudhari
Published on: 
Updated on: 

Mumbai Goregaon Toddler Death: मुंबईतील गोरेगाव परिसरात १८ महिन्यांच्या चिमुरडीचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात शेजारी राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुरडीला जिन्यात ढकलल्याचे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी गोरेगाव येथील एका गृहनिर्माण सोसायटीत आई-वडील आणि चार भावांसोबत राहत होती. बुधवारी रात्री ती घराबाहेरील कॉरिडॉरमध्ये एका मांजरीसोबत खेळत होती. काही वेळाने तिच्या आईने तिला शोधण्यासाठी भावाला पाठवले. मात्र, चिमुरडी कुठेही दिसली नाही.

काही वेळ शोध घेतल्यानंतर तिच्या भावाने जिन्यात खाली डोकावून पाहिले. त्यावेळी त्याला तळमजल्यावर एक लहान मूल पडलेले दिसले. त्या मुलाचे कपडे चिमुरडीच्या कपड्यांशी जुळत असल्याने त्याने तातडीने आईला याबाबत सांगितले.

दरम्यान, सोसायटीतील काही रहिवाशांनी जखमी चिमुरडीला उचलून डॉक्टरांकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. फुटेजमध्ये त्याच मजल्यावर राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुरडीला उचलून जिन्यात ढकलल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, संबंधित १० वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंबीय अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी या सोसायटीत राहायला आले होते.

Mumbai Goregaon Toddler Death
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सांगली बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

या प्रकरणाबाबत परिमंडळाचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले की, गोरेगाव पूर्व येथे १८ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेजारी राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुरडीला उचलून ढकलल्याचे दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Goregaon Toddler Death
Palak Muchhal Controversy: पलक मुच्छल यांच्या कार्यक्रमात मोठा राडा! दोन तास गोंधळ, आयोजकांचा गंभीर आरोप, काय घडलं?

दरम्यान, या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित १० वर्षांच्या मुलीला बालकल्याण समितीसमोर (CWC) हजर करण्यात आले आहे. समिती तिची चौकशी करून पुढील निर्णय घेणार आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news