Mumbai Byculla Knife Attack: जेवणाच्या पैशांवरून चुलत भावावर हल्ला; भायखळ्यातील धक्कादायक घटना

आरोपी भावाला अटक व कोठडी
Knife Attack
Knife Attackfile photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: जेवणाच्या पैशांवरुन मोहम्मद जमील मोहम्मद सुल्तान मुमताज अन्सारी या चुलत भावावर त्याचाच भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर नायर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

याप्रकरणी मोहम्मद जमील याच्या तक्रारीवरुन आरोपी भाऊ मोहम्मद मुस्ताक मुमताज अन्सारीविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मोहम्मद मुस्ताकला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अन्सारी बंधू हे बिहारचे रहिवाशी असून ते दोघेही भायखळा परिसरात राहतात. जमील हा मजुरीचे तर मुस्ताक हा भायखळा रेल्वे स्थानकात आंबा, चिंच विक्रीचे काम करतो. चुलत भाऊ असल्याने ते दोघेही एकमेकांना नेहमी भेटत होते.

Knife Attack
NCP Delimitation Bill Stand: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरे

मंगळवारी रात्री आठ वाजता तो मुस्ताककडे गेला होता, यावेळी त्याने त्याच्याकडे जेवणासाठी पैसे मागितले. यावेळी त्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्याला तिथे पुन्हा येऊ नकोस असा दम दिला होता. त्याने त्याच्याकडे पुन्हा जेवणासाठी पैशांची मागणी केल्यानंतर तो प्रचंड संतापला आणि त्याने आंबा कापण्याच्या चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

त्यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार त्याच्या मित्राच्या निदर्शनास येताच त्याने जखमी झालेल्या जमीलला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर प्राथमिक ओषधोपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेनंतर भायखळा स्थानक आणि परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Knife Attack
Supriya Sule INDIA Alliance Meeting: इंडियाच्या बैठकीला सुप्रिया सुळेंची दांडी?

गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी केला हस्तगत

या घटनेनंतर त्याने आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्या चुलत भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद मुस्ताक याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर मोहम्मद मुस्ताकला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.