Mumbai BMC: महापालिका सभागृहात सत्ताधारी - विरोधक आमने-सामने

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या एका विषयावर बोलतांना भाजपा सदस्यांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
BMC
BMC pudhari photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिका सभेत मंगळवारी सत्ताधारी भाजपा, शिंदेची शिवसेना पक्षाकडून विरोधी पक्षातील उबाठा, काॅंग्रेस आणि एमआयएम पक्षातील नगरसेवकांना सभागृह चालू असताना विरोधी पक्षनेत्यांचे निवेदन सुरु असताना एकमेकांवर धावून गेल्याचे दिसून आले. यामुळे काही काळ सभागृहात घोषणाबाजी, आरोप - प्रत्यारोपावरून गोंधळ उडाला होता.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या एका विषयावर बोलतांना भाजपा सदस्यांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

BMC
Panvel Public Toilet Misuse: पनवेल पालिकेच्या सार्वजनिक शौचालयातच थाटला संसार! बेड, सोफा, वॉशिंग मशीनसह स्वतंत्र किचनचा कारभार

याचा प्रत्युत्तर म्हणून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षातील सदस्यांनाही त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आक्रमक भाजपा सदस्यांनी बाकावरून उठून विरोधकांविरोधात घोषणाबाजी केल्याने विरोधी सदस्यही तेवढेच आक्रमक झाले होते.

महानगरपालिकेच्या मुख्यालयात मंगळवारी महापालिकेची सभा होती. यावेळी सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील मिळून सुमारे २३७ नगरसेवक उपस्थित होते.

सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाने पीपीपी म्हणजे सार्वजनिक - खाजगी भागीदारीच्या नावाखाली मुंबईकरांच्या हक्काच्या मालमत्तांचे सुरु असलेल्या खाजगीकरणावर आवाज उठविला. याविरोधात सत्ताधारी सदस्यांकडून त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, परिणामी त्यांनी संपात व्यक्त केल्याने, भाजपा आणि शिंदे सेनेतील नगरसेवक आक्रमक झाले होते.

BMC
Mumbai Stray Pigs: मुंबईकरांना आता भटक्या कुत्र्यांसोबत डुकरांचाही त्रास; ३ ते ४ हजार डुकरांचा वावर

सभागृह नेत्यांकडून विरोधकांचा ‘गॅग’ असा उल्लेख

सभागृहातील गोंधळात सभागृह नेता गणेश खणकर यांनी उबाठासह विरोधी पक्षातील सदस्यांचा ‘गॅग’ असा उल्लेख केल्यामुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाला. आणि सभागृहात सभागृहनेता गणेश खणकर "माफी मागा, माफी मागा" अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र तरीसुद्धा महापौर रितू तावडे कार्यक्रमातील सूचना आणि विषय वाचत होत्या. यामुळे पेडणेकर यांनी आपले थांबलेले निवेदन पुढे सुरू ठेवल्याने सुरु असलेला वाद थांबला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news