Mumbai BMC Fair Rules : उपाययोजनेशिवाय मैदानातील जत्रांना परवानगी नाही !

पालिका करणार नियमित तपासणी
Mumbai BMC Fair Rules
Mumbai BMC Fair Rulespudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : सुरक्षा उपाययोजनेशिवाय मैदानातील जत्रांना परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उपायोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याची नियमित तपासणी पालिकेकडून करण्यात येणार आहे.

शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुट्टयांच्या कालावधीत मोकळया जागा, मैदाने तसेच सार्वजनिक ठिकाणी कोकण महोत्सव, आगरी महोत्सव तसेच विविध सांस्कृतिक व कला महोत्सवांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. अशा महोत्सवांमध्ये मोठया आकाराचे मोटारचलित पाळणे व विविध प्रकारची मनोरंजनाची साधने तसेच खेळण्यांची व्यवस्था करण्यात येते.

Mumbai BMC Fair Rules
Mumbai STP Rules : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशिवाय भोगवटा प्रमाणपत्र नाही !

लवकरच अंमलबजावणी

परवानगी देण्यासंदर्भातील अर्जामध्ये अटी शर्तींचा समावेश करण्यात येणार आहे. या अटी शर्तींची पूर्तता केल्याशिवाय कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. महोत्सवासाठी परवानगी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची खातरजमाही महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai BMC Fair Rules
Poladpur Rural Roads : पोलादपूर कामथे ते पुणे-हिर्डोशी नवा मार्ग हवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.