BMC election : मुंबईत 161 माजी नगरसेवकांनी गमावले कमावलेले प्रभाग

ज्येष्ठ नगरसेवकांना प्रभाग आरक्षणाचा दे धक्का
BMC election
मुंबई ः मुंबई महापालिकेच्या साडेतीन वर्षानंतर निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राजकीय भवितव्य ठरवणारी आरक्षण सोडत मंगळवारी वांद्रेतील बालगंधर्व येथे काढण्यात आली. त्याप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणामध्ये 2017 मध्ये निवडून आलेल्या 161 माजी नगरसेवकांनी आरक्षणात आपले प्रभाग गमावले आहेत. यात ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर 66 प्रभागातील आरक्षण जैसे थे राहिल्यामुळे या प्रभागांतील माजी नगरसेवकांना जीवदान मिळाले असून पुन्हा नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे. मंगळवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीचा मोठा टप्पा पार झाला आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात कोणत्याही क्षणी या निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणावर माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. अखेर मंगळवारी पार पडलेल्या आरक्षणानंतर अनेकांचे पुन्हा नगरसेवक बनण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे. यावेळी सर्व प्रभागांची नव्याने सोडत काढल्यामुळे अनेकांना आपले प्रभाग गमवावे लागले आहेत. 227 पैकी तब्बल 161 प्रभागांमधील आरक्षण पूर्णपणे बदलले असून येथे ओबीसी, एससी, एसटी व महिला आरक्षण पडले आहे. तर काही प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गात गेले आहेत. त्यामुळे 2017 मध्ये ज्यांचे प्रभाग आरक्षणामध्ये होते ते आता खुले झाले आहेत.

BMC election
MHT CET exam : पीसीएम, पीसीबी, एमबीए सीईटी आता वर्षातून दोनदा

खुल्या प्रवर्गातील इच्छुक कार्यकर्त्यांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे. मात्र 161 माजी नगरसेवकांना प्रभाग आरक्षणामध्ये उमेदवारी न मिळाल्यास त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत येणार आहे.शहर व उपनगरांतील 66 प्रभागांतील आरक्षण जैसे थे राहिल्यामुळे या प्रभागांत 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना पुन्हा नगरसेवक बनण्यासाठी पक्षाकडे दावा करण्याची संधी आहे. परंतु त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे.

ज्यांना लॉटरी लागली त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर ज्यांचा वॉर्ड गेला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता दिसली. त्यांचा वॉर्ड गेल्याने दुसऱ्या वॉर्डमध्ये तिकीट मिळणार का याची चाचपणी केली जाईल, तर त्याच वार्डमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले.

निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले माजी नगरसेवक, नवे इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले माजी नगरसेवक, नवे इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे.

या दिग्गजांनी गमावले प्रभाग

रवी राजा ( माजी विरोधी पक्षनेता), यशवंत जाधव ( माजी स्थायी समिती अध्यक्ष), तेजस्वी घोसाळकर, जगदीश ओझा, सुजाता पाटेकर, हर्षद कारकर, हरीश छेडा, रिद्धी खुरसंगे, विद्यार्थी सिंग, संध्या दोषी, कमलेश यादव, जगदीश कुट्टी, ज्योती अळवणी, तुलीप मीरांडा, मनोज कोटक, नील सोमय्या, उपेंद्र सावंत, चंद्रावती मोरे, परमेश्वर कदम, अनिल पाटणकर, मंगेश सातमकर, सुफियान वणू, मिलिंद वैद्य, आशिष चेंबूरकर, अरुंधती दुधवडकर, अतुल शहा, स्नेहल आंबेकर

BMC election
Minor abuse case : अंधेरीत अल्पवयीन प्रेयसीचे बनविले अश्लील व्हिडीओ

यांना मिळाले जीवदान

मकरंद नार्वेकर, रिटा मकवाना, आकाश पुरोहित, अनिल कोकीळ, सिंधू मसुरकर, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, समाधान सरवणकर, हेमांगी वरळीकर, विशाखा राऊत, हरीश भांदिर्गे, प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, आशा मराठे, सुशम सावंत, राखी जाधव, ज्योती खान, प्रकाश गंगाधरे, प्रीती सातम, संदीप पटेल, बाळा तावडे, संजय घाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news