BMC demolition : महापालिकेच्या कारवाईमुळे अंध व्यक्तीसह संपूर्ण कुटुंब रस्त्यावर

कोणतीही पूर्वसूचना न देता ४० वर्षांपूर्वीचा स्टॉल जमीनदोस्त, परिसरात संताप व्यक्त
BMC demolition
BMC demolitionpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महापालिकेने बुधवारी कारवाई करत एका ज्येष्ठ आणि अंध व्यक्तीचा ४० वर्षांपूर्वीचा स्टॉल जमीनदोस्त करून त्यांचा उदरनिर्वाह हिरावून घेतला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्यामुळे सत्तरी ओंलाडलेल्या त्या अंध व्यक्तीसह त्यांचे संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ते स्वत: अंध, तर पत्नी दिव्यांग आहे.

मुंबई महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या पेडर रोड येथील भुलाबाई देसाई मार्गावरचा ब्रिच कँडी रुग्णालयाबाहेर वय (७३) पांडुरंग शेलार यांचा टेलिफोन, एसटीडी बूथचा जुना स्टॉल कार्यरत होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मुरली देवरा यांच्या काळात अमरसन्स कलेक्शन या नामांकित ब्रँडतर्फे परिसरात सुशोभीकरणाप्रसंगी १९८७ साली शेलार यांना स्टॉलचे अलॉटमेंट लेटर देऊन तो स्टॉल त्यांच्या उदरनिर्वाहसाठी सुपूर्द केला होता.

BMC demolition
Mumbai Ganeshotsav facilities : गणेशोत्सवात पिण्याचे पाणी व मोबाईल शौचालय

शेलारांना लहान वयातच दृष्टी गमवावी लागल्याने भावंडांनी त्यांना विभक्त केले होते. हाजीअली इथल्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड येथून रस्त्यावर चालणे, फिरणे आणि चलान ओळखण्यासह काही महत्वाच्या गोष्टींचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. संचालकांकडून व्यावसायासाठी विचारणा करण्यात आली.

त्यावेळी अमरसन्स शोरूमच्या मालकांनी पेडर रोड परिसरातील सुशोभीकरण हाती घेतले होते. त्यानिमित्त तिथे रंग-रंगोटी नवीन बस थांबा त्याचबरोबर टेलिफोन बूथ देखील लोकार्पण करण्यात आले होते. स्टॉल सुपूर्द करताना पांडुरंग शेलार यांना अलॉटमेंट लेटरदेखील देण्यात आले होते, ते आजही त्यांनी सांभाळून ठेवले आहे. त्यावेळी मोबाईलची सुविधा नसल्याने टेलिफोन एसटीडी बूथ खूपच फॉर्मात चालत होते. मोबाईल आल्यानंतर शेलार यांचा व्यवसाय ठप्प झाला होता.

BMC demolition
Jambarung Dam project : ५० वर्षांनंतरही जांबरुंग धरणाचे काम कागदावरच

पीसीओ एसटीडी बूथ जमीनदोस्त

  • शेलार कुटुंबीय कसेबसे दिवस काढत होते. मुलीच्या विवाहासाठी त्यांनी कर्ज काढले होते ते आजही फिटलेले नाही. काही दिवसांपासून त्यांना डी विभाग परिरक्षण खात्यातील अधिकारी फोनद्वारे सतवणूक करत होते.

  • त्यावेळी शेलार यांची तब्येत बरी नसल्याने पालिका अभियंत्याना मी बरे वाटल्यावर कार्यालयात येऊन भेटतो, असे सांगितले होते. एका मनसे कार्यकर्त्यासोबत घेऊन तशी बोलणी मागच्या शुक्रवारी अभियंत्यांसोबत झाली होती.

  • तरीही मंगळवारी सकाळी पालिका अधिकारी अचानक जेसीबी घेऊन शेलार यांचे स्टॉलजवळ दाखल झाले आणि सदर कारवाई शेलार नसताना करण्यात आली त्यामुळे ४० वर्षांपासून अन्नपाणी देणारा त्यांच्या हक्काचा पीसीओ एसटीडी बूथ जमीनदोस्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news