Mumbai Tree Cutting : चार मोठ्या प्रकल्पांसाठी ४५७ झाडांवर कुऱ्हाड

६ वर्षांत तब्बल २१ हजार झाडांची कत्तल
Tree Cutting
Tree CuttingPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मुंबईतील चार मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. या मंजुरीनुसार, २५३ झाडे तोडली जाणार आहेत तर २०४ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

यातील सर्वात मोठा प्रस्ताव भांडुप (पश्चिम) येथे नवीन क्लिअर वॉटर पंपिंग स्टेशन उभारण्याबाबत आहे. दररोज २ हजार दशलक्ष लिटर क्षमतेच्या या प्रकल्पासाठी १८४ झाडे तोडावी लागतील व १५० झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल. प्रकल्पाच्या कामात अडथळा न ठरणारी झाडे जागेवरच कायम ठेवली जाणार आहेत.

Tree Cutting
Dam Water Stock 2026 : राज्यातील धरणसाठा ७२ टक्क्यांवर

दुसरा प्रस्ताव परळ येथील केईएम रुग्णालयातील कर्मचारी सुविधांच्या पुनर्विकासाशी संबंधित आहे. येथे जुनी इमारत पाडून नवीन कर्मचारी इमारत बांधली जाणार आहे. या प्रक्रियेत, परिसरातील १९६ पैकी २८ झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येथे २२ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. उर्वरित १४६ झाडे जैसे थे राहतील.

तिसरा प्रस्ताव माटुंगा येथील एका कार्यशाळेशी संबंधित आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी विकसित केली जात आहे. या प्रकल्पासाठी तेथील ४२ पैकी २९ झाडे तोडावी लागतील तर उर्वरित १३ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल.

Tree Cutting
Crime News : नात्यातील मुलीशी बोलल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

चौथा प्रस्ताव ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) परिसरातील बांधकामाशी संबंधित आहे. केंद्राच्या उत्तर भागात नियोजित विकासकामामुळे तेथील ८६ पैकी ७१ झाडांवर परिणाम होणार आहे. या प्रस्तावानुसार १२ झाडे तोडली जातील आणि १९ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल.

  • पायाभूत सुविधा आणि विकासाच्या नावाखाली मुंबईत गेल्या ६ वर्षांत आधीच २१ हजार झाडे तोडली गेली आहेत. वृक्ष आणि हरित क्षेत्राच्या मोठ्या ऱ्हासामुळे मुंबईतील तापमान सातत्याने वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news