Dam Water Stock 2026 : राज्यातील धरणसाठा ७२ टक्क्यांवर

१९ टक्क्यांची तूट; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक घट
Dam Water Stock 2026
Dam Water Stock 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात १९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाला सर्वाधिक फटका बसला असून येथील पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत मर्यादित झाला आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षीच्या १३ ऑक्टोबर रोजी राज्यातील धरणात १३०७.१० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा मात्र याच दिवशी पाणीसाठा १०३९.५७ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यभरातील ३ हजार ३३ धरणांतील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत १९ टक्के तूट आहे.

Dam Water Stock 2026
Supreme Court SIR Petition : महाराष्ट्रातील एसआयआरला आव्हान; नोटीस बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्त नकार

राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, मोठ्या प्रकल्पांमध्ये ८० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के, तर लघुप्रकल्पांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत मोठ्या प्रकल्पांमध्ये ९८ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ८२ टक्के आणि लघुप्रकल्पांमध्ये ६४ टक्के पाणीसाठा होता.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे विभागातील धरणांमध्ये ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी तो ९४ टक्के इतका होता. छत्रपती संभाजीनगर विभागात ४३ टक्के पाणीसाठा असून गेल्यावर्षी तो ८७ टक्के होता. यंदा अमरावती विभागात ६१ टक्के, नागपूर विभागात ६९ टक्के, नाशिक विभागात ८० टक्के, तर कोकण विभागात ८९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वच महसूल विभागांतील पाणीसाठा कमी झाला आहे.

Dam Water Stock 2026
Crime News : नात्यातील मुलीशी बोलल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने अधिक चिंताजनक आहे. राज्यातील दहा मोठ्या धरणांमधील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ३१९.१९ टीएमसी म्हणजे ७७ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. कोयना धरणात ८७ टक्के, जायकवाडीमध्ये ७७ टक्के, उजनीमध्ये ८१ टक्के, तर पेंच प्रकल्प समूहात ५० टक्के पाणीसाठा आहे. गोसीखुर्द आणि भंडारदरा धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

  • मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सहा प्रमुख धरणांमध्ये एकूण ९५ टक्के पाणीसाठा आहे. भातसा धरणात ९६ टक्के, तानसामध्ये ९२ टक्के, बारवीमध्ये ९९ टक्के, अप्पर वैतरणामध्ये ९७ टक्के, मध्य वैतरणामध्ये १०० टक्के, तर मोडकसागरमध्ये ६१ टक्के पाणीसाठा आहे. या सहा धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ७४.४१ टीएमसी असून, सध्या ७०.३८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news