Mumbai fake doctor arrest : वांद्रेत बोगस डॉक्टरसह मदतनिसाला अटक

गेल्या पाच वर्षांपासून परिसरातील रुग्णांवर करत होता उपचार
Mumbai fake doctor arrest
वांद्रेत बोगस डॉक्टरसह मदतनिसाला अटकpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वांद्रे येथील अनुज हेल्थ सेंटरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करुन एका बोगस डॉक्टरसह त्याला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक केली. आसिफ हुसैन सरवर शेख आणि अन्वर अन्सार हुसैन शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

यातील आसिफ हा बोगस डॉक्टर असून गेल्या पाच वर्षांपासून तो रुग्णावर उपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वांद्रे येथील नंदी सिनेमागृहाजवळ अनुज हेल्थ सेंटर नावाचे क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये उपचार करणारा डॉक्टर बोगस असून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. तरीही तो रुग्णांवर उपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी म्हणून घेत असल्याची माहिती महागरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी प्रिया जितेंद्र जाधव यांना मिळाली होती.

Mumbai fake doctor arrest
Radium shop raid | रेडियम दुकानावर छापा टाकून 33 बनावट एचएसआरपी नंबरप्लेट जप्त

या माहितीनंतर त्यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची मदत घेऊन अनुज हेल्थ सेंटरवर कारवाई केली होती. यावेळी तिथे आसिफ शेख हा डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याचे दिसून आले तर त्याला अन्वर शेख हा मदतनीस म्हणून काम पाहत होता. त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्याने त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी केली नसल्याची कबुली दिली.

गेल्या पाच वर्षांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. त्याच्या क्लिनिकमध्ये असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस होते. या कारवाईत आसिफ शेख आणि अन्वर शेख या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईसाठी वांद्रे पोलिसांकडे सोपविले होते.

Mumbai fake doctor arrest
kolhapur | पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवरच डॉक्टर मद्यधुंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news