Mumbai ASHA Workers: आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड! प्रत्येकाच्या खात्यात ५ हजार रुपये

प्रथमच पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने दिवाळी होणार गोड
salary
salary Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत तळागाळात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. महापौर रितू तावडे यांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण २ हजार १८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

यापूर्वी महापालिकेच्या अखत्यारीतील १ हजार ४६१ आशा स्वयंसेविकांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका महापौर रितू तावडे यांनी घेतली.

salary
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी सात विभागांत १० तास पाणी बंद

त्यानुसार त्यांनी प्रशासनाला निर्देश देऊन उर्वरित ७१९ स्वयंसेविकांचाही या योजनेत समावेश करून घेतला.या निर्णयामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या आशा भगिनींची दिवाळी अधिक गोड आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे.

salary
Torrent Power Project: कर्जतमधील टोरंट वीज प्रकल्पासाठी वृक्षतोड; वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात

मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार, हे सानुग्रह अनुदान कोणत्याही रोख स्वरूपात न देता थेट आशा स्वयंसेविकांच्या मानधन लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल

आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील महिलांनाही लाभ

महापालिकेने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या अन्य महिला कर्मचाऱ्यांसाठीही भाऊबीज भेट जाहीर केली आहे.

त्यानुसार २ हजार ३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (सीएचव्ही) प्रत्येकी १४ हजार रुपये, तर २ हजार ३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी सात हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महापौरांनी घेतली कामाची दखल

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका तसेच बालकांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस या पालिका यंत्रणेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.