Mumbai air pollution : मुंबईतील सर्व प्रमुख ठिकाणची हवा आरोग्यास घातक

सलग तिसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 150 ते 200 दरम्यान नोंदला गेला
Mumbai air pollution
मुंबई : मुंबईचे हे मंगळवारी पहाटे टीपलेले दृष्य. दाट धुके थंडीचे वाटत असले तरी ही हवा तब्येतीला फार बरी नव्हे.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा कायम असून सलग तिसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 150 ते 200 दरम्यान नोंदला गेला आहे. एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणची हवा आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे.

दिवाळी निमित्ताने फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईमध्ये वायू प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांत अनुक्रमे 159, 173 आणि 195 इतका एक्यूआय नोंदला गेला. 21 ऑक्टोबरला (166) त्यात थोडी घट झाली तरी प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही.

Mumbai air pollution
Medical faculty recruitment : 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होणार 1100 शिक्षकांची पदभरती

मुंबईमध्ये मंगळवारी सर्वाधिक एक्यूआयची नोंद छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 189 इतका होता. पवई (177), शिवाजी नगर, मानखुर्द (176) तसेच नेव्हीनगर, कुलाबा (174) येथील हवासुद्धा आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये नोंदली गेली.

एक्यूआय वाढता वाढे

  • 18 ऑक्टोबर 159

  • 19 ऑक्टोबर 173

  • 20 ऑक्टोबर 195

Mumbai air pollution
Goods and services sales : दिवाळीत वस्तू-सेवांची विक्री 6 लाख कोटींवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news