36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होणार 1100 शिक्षकांची पदभरतीpudhari photo
मुंबई
Medical faculty recruitment : 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होणार 1100 शिक्षकांची पदभरती
जुलै 2025 मध्ये स्थापन उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिली
मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 1 हजार 100 ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदे भरण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ऑगस्ट 2023 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉन्स्ट्रेटर आणि कनिष्ठ निवासी पदांची सुधारीत संख्या निश्चित केली होती. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने ही पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता.
जुलै 2025 मध्ये स्थापन उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर तो उच्चस्तरीय सचिव समितीकडे पाठवण्यात आला. संबंधित समितीनेही मंजुरी दिल्याने या पद भरतीला हिरवा कंदील मिळाला.

