Mumbai Air Pollution : मुंबईत प्रदूषणाचा धुरळा; पालिकेची ६८ पथके निष्प्रभ!

तीन हजार बांधकाम प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा!
Mumbai Air Pollution
Mumbai Air Pollutionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेली भरारी पथके कुचकामी ठरत असल्याचा आरोप बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. शहरात तीन हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू असून, सर्व वॉर्ड मिळून केवळ ६८ भरारी पथके कार्यरत आहेत. तरीही प्रदूषण नियंत्रणासाठी नेमकी काय कारवाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी यशोधर फणसे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर वाहनांचे टायर धुतले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. के. पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी २८ पैकी किती ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली, याचा अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली. वायू प्रदूषणाचा विषय गंभीर असताना अधिकारी एसआरएच्या कामाचे कारण पुढे करून वेळ मारून नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Mumbai Air Pollution
Mumbai Construction Pollution : प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांना मनपाकडून अभय !

कारवाईचा वेग वाढवा

अमय घोले यांनी या प्रस्तावात पर्यावरण विभागाच्या सूचना विचारात घेतल्या नसल्याबद्दल आक्षेप घेतला. तर प्रकाश दरेकर यांनी बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. प्रदूषणाची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी, आणि प्रदूषणाचे प्रमाण अधिक आढळल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी केवळ पथकांची नियुक्ती न करता प्रत्यक्ष कारवाईचा वेग वाढविण्याची मागणी सदस्यांनी केली.

Mumbai Air Pollution
Pen Cooperative Urban Bank Scam : ठेवीदारांना मोठा दिलासा

नियमांचे उल्लंघन झाल्यास कामबंदचे आदेश

यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, मुंबईत तीन हजारांपेक्षा अधिक बांधकाम प्रकल्प असून, सर्व वॉर्डमध्ये मिळून ६८ भरारी पथके कार्यरत असल्याची माहिती दिली. नियमांचे उल्लंघन आढळल्यास काम थांबविण्याचे आदेश देता येतात. भरारी पथकांमार्फत तक्रार किंवा माहिती मिळाल्यास त्याची दखल घेतली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.