Mumbai Crime: ‘किन्नर'असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवला, अंगावर पाणी शिंपडलं आणि मग...एअरहोस्टेसवर केला अत्याचार, मुंबईत खळबळ

Mumbai Air Hostess Assault Case: मुंबईतील एका 25 वर्षीय एअरहोस्टेसने आजारी पतीला बरे करण्याचे आमिष दाखवून घरात प्रवेश केल्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे.
Mumbai Air Hostess Assault Case
Mumbai Air Hostess Assault CasePudhari
Published on
Updated on

Mumbai Air Hostess Assault Case: मुंबईत एका 25 वर्षीय एअरहोस्टेसवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःची ओळख ‘किन्नर’ अशी सांगून आजारी पतीला काळ्या जादूच्या माध्यमातून बरे करण्याचे आमिष दाखवत महिलेच्या घरात प्रवेश केला आणि मग तिच्यावर अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी 28 वर्षीय अनिल शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे 12.20 ते 12.50 वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपी किन्नरचा वेश परिधान करून इमारतीत घुसला. सुरक्षारक्षकाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने इमारतीतील अनेक घरांचे दरवाजे ठोठावल्याची माहिती आहे.

आजारी पतीला बरे करण्याचे आमिष

तिसऱ्या मजल्यावर पीडित महिलेने दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने तिच्याशी संवाद साधला. तिच्या पतीची प्रकृती ठीक नसून तो रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजल्यानंतर आरोपीने नजर काढण्याचा आणि धार्मिक किंवा जादूटोण्याद्वारे पतीला बरे करण्याचा दावा केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्यावर पाणी शिंपडले. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिलेने विरोध करत आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने जाताना महिलेकडून 200 रुपयेही घेतले. आरोपीच्या प्रभावाखाली येऊन आपण त्याला पैसे दिल्याचा दावा महिलेने केला आहे.

100 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीला अटक

या घटनेनंतर पीडित महिलेने मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पवई ते कलवा या परिसरातील आरोपीच्या संभाव्य मार्गावरील 100 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

पोलिस उपायुक्त दत्ता नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ए. एस. सावंत, निरीक्षक सुशांत बंदगर आणि उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने तपास करत आरोपीचा माग काढला. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत आरोपीला कलवा परिसरातील एका झोपडपट्टीतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Mumbai Air Hostess Assault Case
Abhijeet Dipke: MMRDA JE भरतीत मोठा घोटाळा? एकाच सेंटरमधून अनेकजण टॉपर, अभिजीत दीपकेने केली चौकशीची मागणी, काय आहे प्रकरण?

आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी अनिल शिंदे याच्याविरोधात बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीसह संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान आरोपीने त्याचे कुटुंब किन्नराचा वेश परिधान करून भीक मागण्याचे काम करत असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Mumbai Air Hostess Assault Case
Who Is a Homemaker: नोकरी करत असाल तरी ‘होममेकर’! कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय; गृहिणीची नवी व्याख्या काय?

मात्र, तो यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता का, याचीही सखोल चौकशी केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीविरोधातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे असून, तपासातून या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news