Mumbai|मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते 'पादचारी प्रथम'मुळे अतिक्रमणमुक्त !

२६ प्रशासकीय विभागांतील ३९९ पदपथांवरील २,८०३ अतिक्रमणांवर कारवाई
मुंबई
मुंबईः हॉटेल व्यावसायिकांच्या मार्जिनल स्पेसबाहेरील कामांवर कारवाई.
Published on: 
Updated on: 

मुंबई : सुगम्य पदपथ धोरणांतर्गत मुंबईकरांना पदपथांवरून सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने मुंबई महापालिकेने 'पादचारी प्रथम' हे विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांतील ३९९ पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत २ हजार ८०३ अतिक्रमणे /फेरीवाले हटवण्याची कार्यवाही करण्यात आली आहेत. त्यात रूग्णालये, शाळा - महाविद्यालये, रेल्वे बस स्थानके यासह सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे.

English SEO Slug

mumbai-500km-roads-encroachment-free-pedestrians-first

Short Keyphrase

5 Meta Keywords

  • mumbai roads encroachment free

  • pedestrians first initiative

  • mumbai footpaths cleared

  • bmc footpath action

  • mumbai civic news

Short Line Meta Description

Over 2,800 encroachments on footpaths across Mumbai's 26 administrative wards have been cleared under the 'Pedestrians First' initiative.

पदपथ हे केवळ पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी आहेत. त्यामुळे पदपथांवर दुकाने, स्टॉल्स उभारणे किंवा विविध प्रकारचे साहित्य ठेवून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला जाणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला.

मुंबई
AI in religious and astrology apps| धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक ॲप्सची चलती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय

पदपथावरील व्यावसायिक वापरकर्त्यांवर कारवाई

पदपथांचा व्यावसायिक वापर होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. पदपथांवर वाहने उभी करून दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांवर तसेच पद्मथ व रस्त्यालगतच्या जागेचा वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी अनधिकृत वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. पदपथांवरील अशा अतिक्रमणांना आळा घालून ते पादचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोकळे, सुरक्षित व अडथळामुक्त ठेवावेत, असे निर्देशही आयुक्त भिडे यांनी दिले.

मुंबई
blood bank NOC deadline | नियमांची पूर्तता न केल्यास रक्तकेंद्रांची एनओसी रद्द होणार

पदपथांवरील अनधिकृत पार्किंगला आळा घाला

पदपथांवर दुचार्कीच्या अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियमित देखरेख व प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.

पुनर्वसनात क्षेत्रफळाची पडताळणी करा

भिडे पुढे म्हणाल्या की, पदपथांवरील अधिकृत दुकाने व स्टॉल्सचे स्थलांतर किंवा पुनर्वसन करताना त्यांच्या मूळ जागेच्या क्षेत्रफळाचे अचूक मोजमाप तपासावे. अधिकृत नोंदी व मंजूर परवानग्यांची पडताळणी करून नियमानुसार पुनर्वसनाची कार्यवाही करावी, जेणेकरून अनधिकृत विस्ताराला आळा बसेल आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे राहतील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news