Shankar Pendse death : मुलुंड ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पेंडसे यांचे निधन

कोकणची वारी, टॅब्लेट अशी 8 पुस्तके प्रकाशित
Mulund library former president Pendse death
मुलुंड ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पेंडसे यांचे निधन pudhari photo
Published on
Updated on

मुलुंड : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागाचे आधारस्तंभ आणि माजी अध्यक्ष शंकर रा. पेंडसे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. सन 1993 पासून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ते कार्याध्यक्ष राहिले होते. ग्रंथसंग्रहालयास अ दर्जा मिळवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांची कोकणची वारी, टॅब्लेट अशी 8 पुस्तके प्रकाशित झाली होती. विविध ठिकाणी त्यांनी कथाकथन कार्यक्रमही केले होते. ते मुलुंड पूर्व येथे राहायचे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

पेंडसे हे या ग्रंथालयाचे पहिले सभासद होते. त्यांचा सभासद क्रमांक 1 अशी नोंद सापडते. ग्रंथालयाच्या आरंभापासून त्यांनी ग्रंथालयाच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी सातत्याने स्वतःला वाहून घेतले होते. अनेक वर्षे ते ग्रंथालयाचे अध्यक्ष होते. विविध कार्यक्रम, वाचकांसाठी स्पर्धा, वाचू आनंदे यासारखे उपक्रम यामध्ये त्यांचा उत्साही सहभाग असे.

Mulund library former president Pendse death
Pune Holi Celebration: पुण्यात उत्साहात होळी; सामाजिक उपक्रम, द्राक्षांचा महानैवेद्य आणि विशेष मुलांचा रंगोत्सव

13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे जयंती साजरी करण्याचा उपक्रम मुलुंडमधील ग्रंथालयात त्यांनीच प्रथम सुरू केला आणि चाळीसेक वर्षे सातत्याने तो यशस्वी केला. उपनगरी साहित्य संमेलन मुलुंडमध्ये भरवण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता.

Mulund library former president Pendse death
Pudhari Rise Up Women Athletics Pune: पुण्यात ‘पुढारी राईज अप महिला ॲथलेटिक्स’ स्पर्धेत युवतींचा दमदार जलवा

पेंडसे सरांच्या जाण्याने साहित्याक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे हसतमुख आणि उत्साही व्यक्तिमत्व सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news