CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

MPSC : विद्यार्थ्यांआडून काहींचा राजकारणाचा प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 'एमपीएससी'ने सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयात विद्यार्थ्यांच्या आडून विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका केली आहे.
निर्णय एमपीएससीच्या निर्णयाचे स्वागत करून ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला आहे. आम्हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते. मात्र काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च : उपमुख्यमंत्री नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. तरीसुद्धा ते या विषयाला नव्या सरकारशी जोडत होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेतली. हा निर्णय अगोदर कोणी घेतला होता, त्याची अंमलबजावणी कोणी करावी, हे लक्षात न घेता विद्यार्थ्यांच्या मागणीचा आम्ही विचार केला. त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत आधीच निर्णय घेतला होता. त्यावर एमपीएससीने निर्णय जाहीर केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससी : विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एमपीएससीच्या निर्णयाचे स्वागत केले. राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news