MPSC ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

MPSC online exam | MPSC ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
MPSC Exam
MPSC ExamPudhari
Published on
Updated on

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संगणक आधारीत (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर मुख्यमंत्री यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे आवश्यक आहे. मात्र, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

MPSC Exam
FDA action on blood banks : रक्तपेढ्या, रक्त साठवणूक केंद्रांना एफडीएचा दणका

यामुळे संगणक आधारित (CBT) परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तोपर्यंत MPSC च्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असून, बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या विविध सुधारणा उपक्रमांचेही कौतुक केले.

MPSC Exam
Bombay High Court : जन्मदाखल्यात बदल करण्याचा पालिकेला अधिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news