Firecracker noise limit : पंचवीस फटाक्यांचाच आवाज मर्यादेतच

सर्वाधिक तीव्रता 97.1 डेसिबल
MPCB Diwali guidelines
पंचवीस फटाक्यांचाच आवाज मर्यादेतच pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 25 प्रकराच्या फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेतली. हे सर्व फटाके तपासणीत योग्य असल्याचे आढळून आले आहेत. यानुसार प्रमाणीत केलेले फटाकेच खरेदी करा असेही आवाहन करण्यात आले आहे.

आवाज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासली. जास्तीत जास्त आवाजाची तीव्रता ही 125 डेसिबल ही विहीत मर्यादा यावर्षीच्या मोजमापात पाळली गेली आहे.

MPCB Diwali guidelines
Hospital intern workload issue : 74% प्रशिक्षणार्थी डॉक्टर करतात वॉर्डबॉय म्हणून काम

सर्वाधिक आवाजाची तीव्रता ही 97.1 डेसिबल इतकी आढळून आली आहे. काही कंपन्यांच्या फटाकांच्या वेष्टनावर ध्वनीची तीव्रता नोंदवली नसल्याचे दिसून आले आहे. या सर्व निरीक्षणाची नोंद डायरेक्टर ऑफ एक्सप्लोजिव्ह यांना पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळी उत्सवात ध्वनीची पातळी राज्यातील एकूण 158 ठिकाणी मोजली जाणार आहे.

MPCB Diwali guidelines
MPSC Exam 2026: एमपीएससीकडून स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

ज्या फटाक्यांच्या वेष्टनावर आवाजाची मर्यादा लिहिलेली नसेल किंवा क्यूआर कोड छापलेला नसेल असे फटाके बाजारात विकले जाऊ शकत नाहीत. हे फटाके पोलिसांनी जप्त केले पाहिजेत.

सुमायरा अब्दुलाली, आवाज फाऊंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news