कुर्ला, पुढारी वृत्तसेवा : कुर्ला चुनाभट्टी येथे असलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय पालिकेने काही दिवसांपूर्वी तोडले होते. या विरोधात आज (दि.२२) वंचितच्या कार्यकर्त्यांनी पालिका एल विभागाच्या समोरील कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला.
कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी पालिकेचे मुख्यद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये काही वंचितचे कार्यकर्ते जखमी झाले. जोपर्यंत पालिका पुन्हा हे कार्यालय उभे करुन देत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही. तसेच सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अर्धा तास सुरू असलेल्या राड्याला अखेर पोलिसांनी शांत केले. त्यानंतर पालिका कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या सुरु केला.
हेही वाचा :