Mosquito bite : मच्छर चावल्याने दोन वर्षांच्या मुलीच्या अंगावर गंभीर इजा!

विलेपार्ले पूर्वेतील छत्रपती शिवाजीनगर परिसरात प्रचंड प्रादुर्भाव
Mosquito bite causes severe injury
मच्छर चावल्याने दोन वर्षांच्या मुलीच्या अंगावर गंभीर इजा!pudhari photo
Published on
Updated on

मालाड : मच्छरांचा त्रास हा मुंबईकरांना नवीन नाही. मात्र लहान मुलांच्या आरोग्यावर आता गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. विलेपार्ले पूर्वेतील छत्रपती शिवाजीनगर येथील एका दोन वर्षांच्या मुलीला मच्छर चावल्यामुळेे अंगावर गंभीर इजा झाल्या असून गेले काही दिवसांपासून ती अधूनमधून वारंवार तापाने फणफणत आहे.

या मुलीच्या वडिलांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार केली असून सामान्य वसाहतीत राहणारही माणसेच आहेत असा सवाल करीत धूर पवारणीची व उपाययोजनांची मागणी केली आहे.

Mosquito bite causes severe injury
Drug trafficking case : 70 वर्षीय ड्रग्ज तस्कर तडीपार

छत्रपती शिवाजी नगरमधील दुर्वांकर इमारतीत राहणारे रहिवासी उत्कर्ष सुरेश बोर्ले यांच्या दोन वर्षांच्या मुलीच्या हातावर व पायांवर डासांच्या दंशाच्या जागोजागी खुणा उमटल्या आहेत. तिला सतत ताप येत आहे. सुरुवातीला हा आजार कांजण्यांचा असल्याचा संशय होता; मात्र खासगी डॉक्टरांनी तपासणी करून हा आजार डासांच्या दंशामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.

Mosquito bite causes severe injury
Raigad ZP Election : सुधागड तालुक्यात 34 उमेदवार निवडणूक रिंगणात

त्यानंतर बोर्ले यांनी पालिकेकडे तक्रार करत आरोप केला आहे की, शेजारील उच्चभ्रू गॅलॅक्सी एक्सॉटिका इमारतीत दर महिन्याला नियमित धुरफवारणी केली जाते. मात्र त्याच परिसरातील सामान्य रहिवाशांच्या वस्तीकडे पालिका कर्मचारी दुर्लक्ष करतात. परिणामी डासांची संख्या वाढून संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ‌‘उच्चभ्रू इमारतींमध्ये नियमित धुरफवारणी केली जाते, मात्र कष्टकरी वसाहतींकडे दुर्लक्ष का?‌’ असा सवालही त्यांनी केला आहे.

या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. कनिष्ठ अधिकारी संदीप शिर्के यांना तक्रारीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. काही वेळा इमारतींमध्ये धुरफवारणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नसावा, अशीही शक्यता आहे.

नीलम दवे, किटक नियंत्रण अधिकारी ,के-ईस्ट

माझ्या दोन वर्षांच्या मुलीच्या दोन्ही हातांवर व पायांवर डासांच्या दंशामुळे गंभीर इजा झाल्या आहेत. तिला वारंवार ताप येत आहे. दोन महिन्यांतून एकदा धुरफवारणी करणारे कर्मचारी येतात; मात्र ते फक्त एका खासगी इमारतीपर्यंतच धूर फवारून निघून जातात. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

उत्कर्ष बोर्ले, मुलीचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news