

पाली ः सुधागड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने मैदानात उतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
जिल्हा परिषद गट
जांभूळपाडा गट क्र. 19 (सर्वसाधारण महिला) 5 उमेदवार ः नीलिमा धैर्यशील पाटील (भाजप), शर्मिला शरद बोडके (शिवसेना), भारती भास्कर शेळके (शेकाप), दिपाली भोईर (शिवसेना), अपूर्वा गणेश कानडे (अपक्ष).
राबगाव गट क्र. 20 (अनुसूचित जमाती) ः 7 उमेदवार ः मंगेश गोविंद निरगुडे (भाजप), काशिनाथ ताया हंबीर (शेकाप), किशोर भिकू डोके (भारतीय कामगार पक्ष), किसन नारायण उमटे (अपक्ष), चंद्रकांत कृष्णा वारगुडा (भाजप), दिपाली दिलीप भोईर (शिवसेना), विश्वास अनंत भोय (अपक्ष).
पंचायत समिती गण ः
परळी गण क्र. 37 (ना.मा.प्र. महिला) 3 उमेदवार ः प्रणिता राजेश परदेशी (शिवसेना उबाठा), सुनंदा विठ्ठल सिनकर (भाजप), स्वप्ना प्रवीण कुंभार (शेकाप),
जांभूळपाडा गण (सर्वसाधारण) 5 उमेदवार ः जागृती राजेश मानकर (भाजप), अतिश गोविंद सांगळे (शेकाप), हर्षदा मारुती शिंदे (मनसे), स्वप्निल अनंत गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), रमेश रामभाऊ सुतार (शिवसेना उबाठा).
राबगाव गण क्र. 39 (अनुसूचित जमाती महिला) 5 उमेदवार ः मनीषा भरत डोके (शेकाप), शशिकला शरद दापसे (शेकाप), सुनिता किसन लेंडी (भाजप), पूजा नितीन हंबीर (भाजप), चित्रा चंद्रकांत वाघमारे (अपक्ष).
अडुळसे गण क्र. 40 सर्वसाधारण) 9 उमेदवार ः राजेश शरद मपारा (अपक्ष), किशोर नारायण पवार (शिवसेना उबाठा), मिलिंद भिकू शेळके (शेकाप), भावेश दिलीप बेलोसे (मनसे), संजीव दत्ताराम ठकोरे (शेकाप), सई संदेश शेवाळे (राष्ट्रवादी ), संदेश परशुराम शेवाळे (राष्ट्रवादी), शरद लक्ष्मण चोरगे (अपक्ष), सनील चंद्रकांत गोफण (अपक्ष).
संधी कुणाला मिळणार
स्थानिक प्रश्न, आरक्षणाचे समीकरण, पक्षीय ताकद आणि अपक्षांची भूमिका यामुळे सुधागड तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सर्वच लढती चुरशीच्या
सुधागड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.