Morbe Dam water storage : मोरबे धरणात ७३.९० टक्के पाणीसाठा

पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Morbe Dam water storage
Morbe Dam pudhari photo
Published on: 
Updated on: 

वाशी : एल-नीनो व आयओडीबाबत वर्तवलेल्या अंदाज या जागतिक हवामान बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मोरबे धरणात फक्त ७३.९० टक्के इतका वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जपून पाणी वापरावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्राला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. नवी मुंबई महापालिका क्षेत्राची पाण्याची पुरवठ्याची गरज लक्षात घेता व भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Morbe Dam water storage
Sambhajinagar News : वादग्रस्त बॉण्डवरील दस्त नियमित करण्यासाठी निदर्शने

नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. बांधकामासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करु नये, बांधकामासाठी या पाण्याचा वापर करण्यात येत असल्यास नळजोडणी खंडीत करण्यात येईल व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याने वाहन धुताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Morbe Dam water storage
fake CSR donation scam : बनावट सीएसआर देणगी रॅकेट; ईडीची आठ ठिकाणी छापेमारी

पाण्याच्या साठवण टाक्या भरुन वाहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. गरज नसताना घरातील पाण्याचे नळ बंद करावेत. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news