

MNS Marathi Asmita Morcha
मुंबई : अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये मनसेने 'मराठी अस्मिता' मोर्चाचे आयोजन केले आहे. पण, मोर्चा आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, यानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे समजते.
मनसेच्या 'मराठी अस्मिता' मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. दरम्यान, संदीप देशपांडे, राजू पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीलाही पोलिसांनी नोटीस दिली आहे.