‌Jupiter Lifeline Hospital BKC project : ‘ज्युपिटर‌’ला वांद्रे-कुर्ला संकुलात मिळणार भूखंड

400 खाटांचे रुग्णालय उभे राहणार
Jupiter Lifeline Hospital BKC project
Jupiter Lifeline Hospital BKC projectpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील 2.47 एकर जमीन दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर दिल्याने एमएमआरडीएला 354 कोटी रुपये मिळणार आहेत. ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालयाला ही जमीन देण्यात आल्याने लवकरच 400 खाटांचे रुग्णालय येथे उभे राहणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंड एमएमआरडीएतर्फे विविध संस्थांना भाडेपट्ट्याने दिले जातात. यातून एमएमआरडीएला उत्पन्न प्राप्त होते. ज्यूपीटर रुग्णालयाचे हे सातवे रुग्णालय असेल. यामुळे रुग्णालयाची एकूण क्षमता 3 हजार खाटांची होईल. ठाणे, पुणे, इंदौर, डोंबिवली, इत्यादी ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. ज्यूपीटरप्रमाणेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजलाही वांद्रे-कुर्ला संकुलात जागा देण्यात आली आहे.

Jupiter Lifeline Hospital BKC project
Ashok Kharat Case | जमीन व्यवहारातून काळ्याचे केले पांढरे
  • एकूण 10 हजार 26 चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड 80 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आला आहे. यासाठी ज्युपिटर रुग्णालयाकडून एमएमआरडीएला 354 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी 25 टक्के रक्कम म्हणजेच 88.5 कोटी रुपये एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वर्षभराच्या कालावधीत दिली जाईल. पुढील 24 ते 30 महिन्यांत येथे रुग्णालय उभे राहील. यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून 600 कोटी गुंतवले जात आहेत.

Jupiter Lifeline Hospital BKC project
Pandit Bhimsen Joshi Hospital Negligence: भाईंदर हादरले! आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचा हात कुरतडला; निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news