MLC Election 2026 Voting Live: राज्यात पदवीधरसाठी मतदान सुरू; डॉ. स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune MLC Election 2026 Live: 5 मतदार संघासाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणार आहेत.
MLC Election 2026 Voting
MLC Election 2026 Voting pudhari

MLC Election 2026 Voting Live:

MLC Election 2026 Voting Live: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) मतदान होत आहे. 5 मतदार संघासाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणार आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातून महायुतीच्या डॉक्टर स्मिता योगेश जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अन् सर्व सुशिक्षित मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन देखील केलं.

राज्यातील सर्व मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी मतदान कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य रवाना झाले. दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर सर्व तयारीस सुरुवात केली. सायंकाळपर्यंत बहुतांश मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात मतदान 

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात मतदान होत आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असून महायुतीने सूक्ष्म नियोजन केल्याचं दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर...

मंत्री अतुल सावे हे मतदान करण्यासाठी शिशूविहार शाळा येथील मतदान केंद्रात दाखल.

डॉ. स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे पदवीधर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्मिता जाधव यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मतदारांना देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करून आपला हक्क बजावावा असे आवाहन देखील केले आहे.

अकोला: जिल्ह्यात १३ मतदान केंद्रे; निवडणुकीला सुरुवात

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, या प्रक्रियेसाठी अकोला जिल्ह्यात १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

गडचिरोली पदवीधर निवडणूक

गडचिरोली जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 26 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात 13 हजार 608 पदवीधर मतदारांची नोंदणी, 9 हजार 310 पुरुष तर 4 हजार 298 महिला मतदार आहेत. नक्षलमुक्त गडचिरोलीतील पदवीधर निवडणुकीकडे लक्ष असणार आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 81 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून पस्तीस हजार 810 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. या निवडणुकीत एकूण 26 उमेदवार असून यवतमाळ जिल्ह्यात 18 केंद्रावर 6932 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे एका मतदान केंद्रावर पाच याप्रमाणे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news