Mira Road attack: मीरा रोडचे हल्ला प्रकरण सेल्फ रॅडिकलायझेशनचे; मुख्यमंत्री फडणवीस यांचा अंदाज

त्याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, हे आता तपासातून पुढे येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Mira Road attack
Mira Road attackPudhari
Published on
Updated on

मुंबई: मीरा रोडला दोन सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून चाकू हल्ला चढवणाऱ्या झैब झुबेर अन्सारीचे प्रकरण हे सेल्फ रेडिकलायझेशनचे असावे, असा अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे, इतर धर्मियांना मारायचे, अशा विचारातून त्यांने हे कृत्य केले आहे. त्याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, हे आता तपासातून पुढे येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mira Road attack
Political News: प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांमध्ये 100 कोटींचा गैरव्यवहार; खासदार संजय राऊत यांचा आरोप

मुख्यमंत्री म्हणाले, मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा (अतिरेकीपणा, कट्टरतावाद) जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नातून मीरा रोडचा आरोपी तयार झालेला दिसते. आपल्याला जिहाद करायचा आहे, इतर धर्मियांना मारायचे आहे, अशा विचाराने पेटून त्यांने हे कृत्य केले आहे. आता एटीएस आणि एनआयएची मदत घेऊन, या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे, हेही शोधण्यात येईल.

Mira Road attack
Airlines Fuel Price Hike: इंधन दरवाढीमुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची भीती; पॅकेज, करात सूट देण्याची विमान कंपन्यांची मागणी

आरोपीचे कुटुंब परदेशात अमेरिकेत आहे. तोही अनेक वर्षे परदेशात राहिला आहे. इथे आल्यानंतर, आधी तो कुर्ल्यात आणि नंतर नयानगरमध्ये रहायला आला. आता त्याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत? अजून कोणी असे रॅडिकलाईज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news