Mira-Bhayandar news: गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.
Car airbag
Car airbagFile Photo
Published on
Updated on

Mira-Bhayandar news Car airbag death

मिरा-भाईंदर : प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. मोहित सोनी (वय २५) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Car airbag
Beed Crime News : थार गाडीचा थरार; धडकेत युवकाचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवत असताना अचानक एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहितच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मोहित सोनीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, गाडीतील एअरबॅग कशामुळे उघडली आणि या घटनेमागे काही तांत्रिक बिघाड आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Car airbag
Latur accident | सीट बेल्ट न लावणे चालकाच्या जीवावर बेतले; भीषण अपघातात दीड वर्षाच्या निष्पाप बाळासह दोघांचा मृत्यू
Car airbag
प्रवाशांची काळजी; छोट्या कारमध्ये हव्यात सहा एअरबॅग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news