Eknath Shinde: दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांना 'मकोका' लावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणा दरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या.
Eknath Shinde
Eknath ShindePudhari
Published on
Updated on

मुंबई: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे व त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही यासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणा दरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या.

Eknath Shinde
CIDCO Housing Scheme 2026: सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी गृहनिर्माण योजना

अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोग सारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते.

भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवा, असेही ते म्हणाले. त्यांच्यावरील खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
Drug Free Mumbai Campaign: जुलैमध्ये १ हजार ४९७ पानटपऱ्यांवर कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news