CIDCO Housing Scheme 2026: सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी गृहनिर्माण योजना

४,७७९ सदनिकांसाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू
CIDCO
CIDCOPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) तळोजा, कळंबोली आणि खारघर येथील तयार असलेल्या ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना आज दि.11 ऑगस्ट मंगळवारी जाहीर केली. येत्या शुक्रवारी दि. १५ ऑगस्टपासून यासाठी ऑनलाईन नोंदणी सकाळी ११ वाजता सुरु केली जाणार आहे.

www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध आहेत. योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

CIDCO
Drug Free Mumbai Campaign: जुलैमध्ये १ हजार ४९७ पानटपऱ्यांवर कारवाई

प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत आणि सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत असलेले आणि कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

CIDCO
Mumbai Mobile Theft Gang: एक धक्का, चार हात आणि मोबाईल गायब! मुंबईतील ‘धक्का गँग’चा पोलिसांनी केला पर्दाफाश

तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत. सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन राहतील असे सिडकोकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news