Varli Hit And Run : मिहीर शहाचा वाहन परवाना रद्द होणार

आरटीओकडे वरळी पोलीस पाठपुरावा करणार
Mihir Shah's driving license will be cancelled
मिहीर शहाचा वाहन परवाना रद्द होणारPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : वरळी हिट अँण्ड रन गुन्ह्यांतील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा वाहन परवाना रद्द होणार आहे. त्याचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले. रविवारी (दि.7) मिहीरने त्याच्या बीएमडब्ल्यू कारने एका बाईकला धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्याने कावेरीला त्याच्या कारमधून दिड किलोमीटरपर्यंत फरफरत नेले होते.

Mihir Shah's driving license will be cancelled
वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शाहचा कबुलीनामा

अपघाताच्या वेळेस मिहीरने मद्यप्राशन केले होते. त्याचा कारचालक त्याच्यासोबत असताना त्याने मरिनड्राईव्ह येथे लॉंग ड्राईव्ह करण्यासाठी स्वत कार चालविण्याचा प्रयत्न केला. जास्त मद्यप्राशन केल्याने त्याचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका बाईकला धडक दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे मिहीरचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी पोलीस आरटीओकडे पाठपुरावा करणार आहे. मिहीरची पोलीस कोठडीची कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून येणार्‍या प्रत्येक माहितीची शहानिशा केली जात आहे. या गुन्ह्यांत वरळी पोलिसांनी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news