

MHT CET Results 100 Percentile Students
मुंबई: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गटासाठी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा तब्बल २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवून सर्वोत्तम यश संपादन केले आहे. यात पुणे, मुंबई, नांदेड, कोल्हापूर या जिल्यातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत.
राज्यभरातील अभियांत्रिकी व फार्मसी, कृषी व काही वैद्यकीय प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा टॉप कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित मानला जातो. सीईटी सेलकडून ही परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान तसेच ५ मे रोजी अतिरिक्त दिवशी घेण्यात आली होती. एकूण ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१.०४ म्हणजे ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाराष्ट्रातील २०७ आणि महाराष्ट्राबाहेरील १७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
निकालात १०० पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, नांदेड, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांतील तसेच कोलकाता व नवी दिल्लीसारख्या राज्याबाहेरील जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.