MHADA Housing Issue: आम्हालासुद्धा द्या 500 चौरस फुटांचे घर! म्हाडाच्या पुनर्रचित इमारतीतील रहिवाशांची मागणी

धारावीतील चाळी व इमारतींतील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला.
MHADA Housing Issue
MHADA Housing IssueFile Photo
Published on
Updated on

मुंबई: धारावीतील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर मिळणार, मग पुनर्रचित इमारतींतील रहिवाशांना 405 चौरस फुटांचे घर का ? असा प्रश्न उपस्थित करत आम्हालासुद्धा 500 चौरस फुटांचे घर द्या, अशी मागणी म्हाडाच्या 388 पुनर्रचित इमारतींतील रहिवाशांनी केली आहे.

MHADA Housing Issue
Bribe News: अडीच लाखांची लाच घेताना पालिकेचा दुय्यम अभियंता अटकेत

म्हाडाने 388 म्हाडा पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासासाठी जाहीर केलेल्या धोरणानुसार या इमारतींमध्ये राहणाऱ्या 27 हजार रहिवाशांना 33(24) अधिनियमानुसार 405 चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे. धारावीतील चाळी व इमारतींतील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. तसेच बीडीडी चाळींतील रहिवाशांनाही 500 चौरस फुटांची घरे देण्यात येत आहेत.

MHADA Housing Issue
Mumbai Heatwave: मुंबईत उष्णतेची लाट कायम! तापमान ३६ अंश पार, नागरिक हैराण

मुंबईच्या इतर भागांत 500 चौरस फुटांची घरे दिली जात असताना म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींतील रहिवाशांमध्ये भेदभावाची भावना निर्माण झाली आहे. त्यांनीही आता 500 चौरस फुटांच्या घराची मागणी सुरू केली आहे. 388 इमारतींमध्ये 27 हजार कुटुंबे राहतात.

धारावीतील झोपडीधारक कोणतेही कर भरत नसताना त्यांना 500 चौरस फुटांचे घर दिले जात आहे. आम्ही म्हाडाचे भाडेकरू आहोत. सर्व कर भरतो. तरीही आम्हाला 405 चौरस फुटांचे घर का?

- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मंदार निकेतन रहिवासी मंडळ, भायखळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news