Dussehra rally Azad Maidan: आझाद व क्रॉस मैदानांवर दसरा मेळावा आयोजनाला एमसीएचा विरोध

नियोजित क्रिकेट स्पर्धांवर परिणाम होणार; मैदानाचे नुकसान होण्याची शक्यता
Dussehra rally Azad Maidan
Dussehra rally Azad MaidanPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आझाद, क्रॉस मैदानांवर प्रस्तावित दसरा मेळाव्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार दिला आहे. नियोजित सामने आणि मैदानाचे नुकसान होण्याची शक्यता ही कारणे आहेत.

शिवसेना शिंदे गटाने यंदाचा दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आझाद आणि क्रॉस मैदान मिळावे, अशी विनंती मुंबई महापालिकेला केली आहे.

दोन्ही मैदाने १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी आधीच आरक्षित असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनने आझाद मैदान आणि क्रॉस मैदानावर प्रस्तावित दसरा मेळाव्याला विरोध दर्शविला आहे.

आझाद आणि क्रॉस मैदाने नियोजित सामने, स्पर्धा आणि इतर क्रिकेटविषयक उपक्रमांसाठी निश्चित करण्यात आली आहेत, त्यामुळे प्रस्तावित कार्यक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे एमसीएने राज्य क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना २१ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dussehra rally Azad Maidan
IIT Bombay Protest: आयआयटी मुंबईत आंदोलन सुरूच! विद्यार्थ्यांत दोन गट; प्रवेशद्वारावर ४० विद्यार्थ्यांचा ठिय्या

मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे खेळपट्ट्या (पिचेस), आऊटफील्ड्स आणि सरावाच्या जागांचे नुकसान होऊ शकते. अवजड वाहनांची ये-जा, तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे आणि लोकांची मोठी गर्दी यामुळे मैदानाची पूर्ववत दुरुस्ती करणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते, अशी भीतीही क्रिकेट असोसिएशनने व्यक्त केली आहे.

मेळाव्यासाठी ठिकाण निश्चित नाही

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही, असे शिवसेना शिंदे गटातर्फे सांगण्यात आले आहे. दसरा मेळाव्यासाठी आम्ही काही मैदाने किंवा ठिकाणांसाठी अर्ज केले आहेत.

Dussehra rally Azad Maidan
MBBS BDS CAP Round 3: एमबीबीएस, बीडीएस प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; २६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी

आझाद मैदान, क्रॉस मैदान, तसेच वरळी डोम आणि गोरेगाव एक्झिबिशिन सेंटर यांचा समावेश आहे. पाऊस आणि इतर बाबींचा विचार करून अंतिम ठिकाण निश्चित केले जाईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी सांगितले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटसाठी नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या मैदानांवर भविष्यात खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी एक व्यापक धोरण किंवा प्रणाली असावी, अशी मागणी एमसीएने केली आहे. एमसीएने आझाद आणि क्रॉस मैदान या क्रीडा स्थळांचे जतन, देखभालीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. क्रिकेटच्या आयोजनासाठीच नव्हे, तर शहराचा महत्त्वाचा क्रीडा वारसा जपण्यासाठीही या मैदानांचे अनावश्यक नुकसानापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे, आम्ही आपल्या हस्तक्षेपाची अपेक्षा करतो आणि प्रस्तावित दसरा मेळाव्यासाठी दिलेल्या परवानगीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करतो.

- प्रा. डॉ. उन्मेष खानविलकर, सचिव, एमसीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news