मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंत (बीडीएस) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसर्या फेरीअंती एमबीबीएसच्या 636 व बीडीएसच्या 891 जागा रिक्त राहिल्या असून, या जागा भरण्यासाठी राज्य सीईटी सेलने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
दुसर्या फेरीत भरलेले प्राधान्यक्रम आता वैध राहणार नाहीत. सर्व उमेदवारांनी तिसर्या फेरीसाठी नवे प्राधान्यक्रम भरावयाचे आहेत. तिसर्या फेरीत जागा मिळाल्यास त्या उमेदवाराने प्रवेश घेणे अनिवार्य आहे; अन्यथा पुढील फेर्यांसाठी पात्रता गमावली जाईल. तसेच, एनआरआय उमेदवारांनी 7 ऑक्टोबरपूर्वी स्वतंत्र एनआरआय नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एमबीबीएसमध्ये खासगी महाविद्यालयांत 468 व शासकीय महाविद्यालयांत 168 जागा रिक्त आहेत. तर बीडीएसमध्ये खासगी महाविद्यालयांत 838 आणि शासकीय महाविद्यालयांत 53 जागा रिक्त आहेत. दंत अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल तुलनेने कमी असला तरी अखेरच्या फेरीत बहुतांश जागा भरल्या आहेत.
वैद्यकीयच्या तिसर्या फेरीसाठी 636 जागा रिक्त राहिल्या असून, यामध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये 468, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये 168 जागा रिक्त राहिल्या आहेत. दंत अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीसाठी 891 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये 838, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये 53 जागा रिक्त राहिल्या आहेत. दरवर्षी दंत अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असतो मात्र अखेरच्या फेरीपर्यंत बहुतांश जागांवर प्रवेश होत असल्याचे निदर्शनास आले आहे.