

मालाड : मालवणी गेट क्रमांक 8 येथील एमएचबी कॉलनीमध्ये मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 6 ते 7 नागरिक गंभीर जखमी झाले आहे. सकाळीच झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांना केअर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघे 50 टक्के भाजल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्रथमोपचारानंतर काही गंभीर जखमींना नायर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्फोट एवढा भीषण होता, की स्लॅब कोसळून तिसऱ्या मजल्यावरून एक महिला आणि चिमुकला दुसऱ्या मजल्यावर आदळले.
केअर हॉस्पिटलमध्ये दाखल जखमी :
विजय अशोक चौधरी (वय 48) : 60 ते 70 टक्के भाजले
तोसिफ खान (वय 22) : 45 टक्के भाजले
अली कासिम (वय 18) : 25 टक्के भाजले
आधार हॉस्पिटलमध्ये दाखल जखमी :
रुमा चौधरी (वय 43) महिला
अलिषा चौधरी (वय 20) महिला
जुलेखा बानू (वय 47) महिला
आदिल शेख (वय 2) मुलगा