Marve Ganesh Visarjan: मार्वे समुद्रकिनारी गणेशमूर्तींच्या लांबच लांब रांगा; मालाडमध्ये वाहतूक कोंडी

मार्वे टी-जंक्शन ते मालवणी चर्चपर्यंत ५० हून अधिक मोठ्या मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत; अनेक मूर्तींचे विसर्जन संध्याकाळपर्यंत रखडले
Marve Ganesh Visarjan
Marve Ganesh VisarjanPudhari
Published on: 
Updated on: 

मालाड: अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी मार्वे समुद्रकिनारी आलेल्या गणेशमूर्तींच्या लांबच लांब रांगा लागल्याने मार्वे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. मार्वे टी-जंक्शन ते मालवणी चर्चपर्यंत रस्त्यावर सुमारे ५० हून अधिक मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत होत्या. तर मार्वे समुद्रकिनारीही ५० हून अधिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभ्या होत्या. त्यामुळे अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन संध्याकाळपर्यंत रखडले.

Marve Ganesh Visarjan
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर! फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

मार्वे समुद्रकिनारी गोरेगाव तसेच कांदिवली पूर्व-पश्चिम परिसरातून शेकडो गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. उशिराने निघालेल्या गणेशमूर्ती, संथ वाहतूक आणि रस्त्यावरील गर्दीमुळे मंडळांना मार्वे समुद्रकिनारी पोहोचण्यास विलंब झाला. मार्वे टी-जंक्शन ते समुद्रकिनाऱ्यादरम्यानचा रस्ता गणेशमूर्तींनी भरून गेला होता. त्यात डम्पर, व्हॅनिटी व्हॅन तसेच बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

Marve Ganesh Visarjan
Mumbai Ganpati Visarjan 2026: मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, नेमकं काय घडलं?

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस आणि वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक झाली. मालाड ते मढ जेट्टीदरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस क्रमांक २७२ व २७१, तसेच बोरिवली ते मढ जेट्टी जाणारी २६९ क्रमांकाची बस मालवणी चर्च येथून वळवण्यात आली.

Marve Ganesh Visarjan
Mumbai Ganpati Visarjan 2026 : भक्‍तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

विसर्जनासाठी विशेष नियोजन

मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे करता यावे, यासाठी पालिकेच्या पी-उत्तर विभागाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. समुद्रकिनारी लोखंडी फ्लॅट टाकण्यात आले होते. तसेच विसर्जनासाठी तराफे, क्रेन आणि मोठ्या बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

Marve Ganesh Visarjan
Drug Inspector Exam Paper Leak | औषध निरीक्षक प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या ११ वर

पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातून लाऊडस्पीकरद्वारे सतत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात होते. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राणी पुरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणात सहभाग घेतला.

दरम्यान, मालवणी क्रमांक १ ते अग्निशमन दल आणि शहीद अब्दुल हमीद रस्ता गुलालाने गुलाबी झाला होता. विसर्जनानंतर परिसरातील स्वच्छतेसाठी सामाजिक संस्था, विविध संघटना तसेच शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही सरसावले होते. महिला, पुरुष आणि चिमुकल्यांसह मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news