

मुंबई : भायखळा व सायन रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे शनिवार मध्यरात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4.30 पर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विशष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. भायखळा येथे 4 स्टील गर्डर्स व सायन येथे 40 मीटर स्पॅन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकलचा प्रवास अर्ध्यावर संपवण्यात येणार आहे.
असा असणार ब्लॉक
ब्लॉक 1
कधी : 27 सप्टेंबर मध्यरात्री 12.30 ते 28 सप्टेंबर पहाटे 4.30 वाजेपर्यंत
कुठे : अप व डाउन धिम्या व जलद मार्गावर भायखळा आणि परेल दरम्यान
ब्लॉक 2
कधी : रविवार 28 सप्टेंबर मध्यरात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत
कुठे : अप व डाउन धिम्या आणि जलद मार्गावर दादर आणि कुर्ला दरम्यान
उपनगरीय सेवेवर परिणाम
दादर येथून रात्री 10.18 वाजता सुटणारी दादर- कुर्ला लोकल रद्द
कल्याण येथून रात्री 11.15 वाजता सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द
कसारा येथून 10 वाजता सुटणारी कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे येथे 11.49 वाजता प्रवास संपवण्यात येईल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 12.24 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे लोकल रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 4.19 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कसारा लोकल ठाणे येथून 5.14 वाजता प्रवास संपवण्यात येईल.
ठाणे येथून पहाटे 4.04 वाजता सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द
या मेल/एक्स्प्रेसवर परिणाम
ट्रेन क्रमांक 11020 (भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस) कुर्ला येथे 3.28 ते 4.15 तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल आणि दादर येथे प्रवास संपवण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ठाणे येथे 3.43 ते 4.00 तासांपर्यंत थांबवण्यात येईल आणि दादर येथे प्रवास संपवण्यात येईल.