

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे ढवळून निघाले आहे. त्रिभाषा सुत्रामुळे महराष्ट्रात हिंदीची सक्ती केली जात होती. याविरोधात सर्वच विरोधी पक्षाने रान उठवले होते. तर राज व उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार होते. पण तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय रद्द केला. पण याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहते. मराठी भाषेची होणारी गळचेपी मराठी बांधवाना सहन होत नाही. अनेकजण विविध माध्यमातून यावर व्यक्त होत आहे.
आता मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री व कवयत्री स्पृहा जोशी हिने या आपल्या अंत्यत संवेदनशील कवितेतून मराठी भाषेविषयी, हिंदी सक्तीविषयी व मराठीचा कसा राजकारणासाठी उपयोग केला जातो याचा चित्रण मांडले आहे. आपल्या कवीतेतून मराठीची कशी गळचेपी केली जाते. तसेच राजकारणी लोक सोयीस्कररित्या याचा मुद्दा करुन राजकारण करतात. तसेच यामुळे आपल्यास डोळयासमोर मराठी कशी हरत आहे याचेही अत्यंत समर्पक शब्दात वर्णन केले आहे.
कवीतेचे शिर्षक मायबोली
स्पृहाने आपल्या कवितेचे शिर्षक मायबोली असे ठेवले असून. सुरवातीच्या ओळींमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची आठवण केली आहे. मराठी अमताची बोली असून रसगंगा आहे. विविध परंपरेतून तयार होत ती ‘अभंग’ झाली आहे. तसेच तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे संतपरंपरेतून अंभगाच्या माध्यमातून मराठी किती जनमानसात किती खोलवर बसली आहे याचे वर्णन केले आहे
पूढे राजकारणामुळे कसा मराठी भाषेचा बळी जातो याचे वर्णन करताना. आपल्या डोळयासमोर आपली भाषा आपण हरलेली पाहतो आहे, राजकारण्यांच्या या खेळामुळे आपली भाषा उदास झाली आहे. मंत्रालयापासून, न्यायालयापर्यंत तिची हेळसांड होत आहे असे स्पृहा म्हणते.
आम्ही मराठीचे जतन करण्यासाठी आपण किती पोटतिडीकीने काम करतो आहे. असे सर्व राजकारणी ठासून सांगत असतात. तर आम्हीच मराठीला वाचवली असे श्रेय लाटून, त्यासाठी किती प्रयत्न केले हे सांगताना नक्राश्रू ढाळले जातात, राजकारणाच्या पटावरून सर्व प्यादी हलतात अशी टीकी सद्यस्थितीवर कवीतेच्या माध्यमातून केली आहे.
सध्या सुरु असलेले मराठीच्या या खेळाला कंटाळून ज्ञानोबा माऊलींनी आता सदेह परत यावे असे आवाहन कवयत्री करताना दिसत आहे. महाराष्ट्रासाठी हुतात्मयांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. पण महाराष्ट्रातील खेळ पाहून त्यांचाही जीव गुदमरत असेल असेही तीने म्हटले आहे. शेवटी स्पृहा जोशीने म्हटले आहे की मनात जे साठले होते ते सर्व या कवितेच्या माध्यमातून मांडले आहे.