

Maratha Reservation | हैदराबाद गॅझेटियर 'जीआर' विरोधातील याचिकेवर सुनावणीस आज (दि. २२) मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी एने गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण केले. पाच दिवसांनंतर राज्य सरकारने त्यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याची मागणी मान्य केली. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देणारा शासन आदेश काढला हाेता.
हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सदानंद मंडलिक आणि कुणबी सेनेकडून या आदेशाविरोधात मुंबइं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आला होत्या. महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन आदेश हा घटनाबाह्य आहे. तो तत्काळ रद्द करण्याची तसेच या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाचा या याचिकांवर सुनावणीस नकार दिला. तांत्रिक कारणांमुळे खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा www.aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. योग्य कागदपत्रे जोडली असल्यास उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील. त्यासाठी कमीत कमी 21 ते 45 दिवस लागू शकतात.
अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट (दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान) यांचा उल्लेख आवश्यक आहे.
ओळखीचा पुरावा (कोणताही एक) अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत आवश्यक आहे.
पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) अर्जदाराचे रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, 7/12 किंवा 8 अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत आवश्यक आहे.
जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहीत नमुन्यातील अर्ज व त्यावर 10 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो.
100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे.