Maratha Andolan|मनोज जरांगे - न्यायमूर्ती शिंदे समिती यांची चर्चा फिस्‍कटली

आंदोलन मागे घेण्यास जरांगे यांचा ठाम नकार
Manoj Jarange-Patil
मनोज जरांगे- पाटीलFile Photo
Published on
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मुंबई येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. यामध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्‍वाखाली मराठा समाज एकवटला असूनआज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुंबईतील या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे शिंदे समिती भेटण्यासाठी गेली आहे. यामध्ये जरांगे व शिष्‍टमंडळामध्ये चर्चा सुरु आहे. पण समिती व जरांगे यांच्यातील चर्चेतून तोडगाच निघालेला नाही. सरकारने दिलेल्‍या प्रस्‍ताव जरांगे यांनी अमान्य केले असून आंदोलन सुरुच ठेवण्याचे ठरविले आहे.

Manoj Jarange-Patil
Raj Thackeray: जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा; राज ठाकरेंचे सूचक विधान

शिंदे समितीने जरांगे यांनी मराठा गॅझेट शोधण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती पण जरांगे यांनी मुदतवाढ देणार नाही असे जरांगे यांनी म्‍हटले आहे. शिंदे समितीने गॅझेटीअरचा अभ्‍यास करण्यासाठी अजून ६ महिने लागतील असे म्‍हटले होते यावर जरांगे यांनी दिलेली मूदत खूप होती त्‍यामुळे मुदतवाढीस नकार दिला.

सध्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्‍येण्याची जरांगे यांनी मागणी केली याला सदरची कारवाई 1 महिन्याच्या कालावधीत करण्यात येईल असे शिंदे समितीने सांगिले. तसेच आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत शिंदे समितीने 158 कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख मदत दिली आहे उरलेल्या 96 लोकांना मदत द्यायची कारवाई सुरु आहे असे सांगितले आहे. तर मृत्यू पावलेल्या आंदोलनात 53 जणांच्या कुटुंबांना परिवहन महामंडळात नोकरी देण्यात आलीय त्यातील 7 लोकांनी नियुक्ती नाकारली असल्‍याची माहिती समितीने दिली आहे.

Manoj Jarange-Patil
Maratha reservation: मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर विखे-पाटलांची मोठी घोषणा; म्हणाले, "मनोज जरांगे..."

शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी सरकारतर्फे करण्यात आली. शिंदे समितीला यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे त्‍यामुळे त्‍यांना पुढे मुदतवाढ येणार नाही असे जरांगे यानी स्‍पष्‍ट केले. एकूणच जरांगे व सरकारमध्ये चर्चा फिस्‍कटली आहे. आंदोलन सुरुच राहणार आहे असे दिसून येते.

शिंदे समिती व मनोज जरांगे यांच्यातील झालेली चर्चा

- जरांगे यांच्याशी चर्चेनंतर शिंदे समिती कुणबी नोंदणी संदर्भात प्रक्रिया सुरु आहे असे सांगितले.

- त्यात कसली प्रक्रिया. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला आहे फक्त अंमलबजावणी कराय, हैदराबाद गॅझेटनुसार उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशी मागणी जरांगे यांनी केली

- आमच्या सरसकट मागणी मान्य झाल्या पाहिजे अशा एक-दोन नको अशी मागणी जरांगे यांनी केली.

- आमच्या पूजेला सर्व प्रक्रिया असतात अगरबत्ती पाहिजे तांदूळ पाहिजे. पण तसं तुमच्या पूजेला तसे काही लागत नाही असेही उदाहरण जरांगे यांनी शिंदे यांना दिलं. त्‍यानंतर आम्‍हाला शिंदे समितीची दिलेली उत्तर काय आम्हाला मान्य नाहीत. बलिदान दिले लोकांनी ते काही व्यर्थ आहे का. जाऊदे जे व्हायचं ते होऊ दे. हे आम्हाला मान्य नाही असेही जरांगे यांनी स्‍पष्‍ट केले.

- शिंदे समिती आणि उपसमितीची पुन्हा बैठक होणार आहे व आम्‍ही हे मंत्री मंडळाच्या बैठकीत सांगू असे शिंदे समितीने जरांगे यांना सांगितले पुढचा निर्णय हा आमचा नसणार मंत्री मंडळाचा असणार आहे असे शिंदे समितीने स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news