

मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 समोरील 600 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी अचानक फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. महापालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
मात्र दिवसभर या वाहिनीवर अवलंबून असलेल्या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तर काही परिसराला 24 तास पाणी मिळाले नाही. कफ परेड (सकाळी 11.30 ते दुपारी 1.45), जी. डी. सोमाणी मार्ग (दुपारी 1.45 ते 3.10), कुलाबा कोळीवाडा (सायंकाळी 6.30 ते 6.50) आणि गीता नगर (रात्री 12.15 ते पहाटे 2.45) या काळात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती काम झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.