

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सचिवपदी उपसचिव पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सुकन्या मंजिरी देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही महापालिका प्रशासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे बुधवारपासून पुन्हा एकदा सचिव विभागाचे नेतृत्व कोकणकन्या करणार आहे.
विद्यमान सचिव रसिका देसाई या 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
त्यांना सचिव विभागाच्या कामकाजाचा 36 वर्ष 6 महिने इतका अनुभव आहे. त्यांनी विशेष समित्यांसह स्थायी, सुधार समिती व मुंबई महानगरपालिका सभागृहाची जबाबदारी सांभाळली आहे.