Mumbai Crime : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मालाडच्या तरुणाचा मृत्यू ?

Mumbai suspicious death : इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करण्यात आल्याचा संशय
Mumbai Crime
Mumbai Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

मालाड : मालाडच्या कुरार परिसरात २० वर्षीय अमन सोनी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अमनला त्याचे काही मित्र गार्डनमध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले. या घटनेत इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अमन सोनी याला त्याचे मित्र घरातून घेऊन गेले होते. काही वेळाने तो गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमनच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर गंभीर आरोप केले आहेत.

Mumbai Crime
Kaumudini|चांदण्यासारख्या पांढऱ्याशुभ्र फुलांची ही वनस्पती घरात ठेवल्याने काय होते?

घटनास्थळी तसेच परिसरात काही इंजेक्शन, औषधांचे साहित्य आणि इतर संशयास्पद वस्तू आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमनच्या मृत्यूमागे नशेसाठी इंजेक्शनचा वापर झाला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अमनच्या कुटुंबीयांनी मित्रांनी त्याला गार्डनमध्ये नेले आणि त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

Mumbai Crime
Dhule Dhangar Reservation protest| धनगर समाजाचा आरक्षण मोर्चा-मेळावा; मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार

कुरार पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून, अमनसोबत त्या दिवशी नेमके कोण होते, त्याला कुठे नेण्यात आले, त्याला कोणते इंजेक्शन देण्यात आले का व मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news